✍️शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड (दिनांक 17 एप्रिल) महापुरुष संयुक्त जयंतीनिमित्त 18 एप्रिल रोजी राजे संभाजी नगर,उमरखेड येथे भव्य प्रबोधन कार्यक्रमाचे राजे संभाजी नगर हे जातीय आणि सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणून उमरखेड शहरात नावा रुपाला आलेले आहे. अठरापगड जाती धर्मातील सर्व महापुरुषांच्या जयंत्या स्मृतिदिन याठिकाणी एकत्र मिळून साजरे केले जातात.

प्रियदर्शि सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्ट भीम जयंती उत्सव समिती तथा जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळाच्या वतीने दि.18 एप्रिल 2025 रोजी राजे संभाजी नगर,बोरबन उमरखेड येथे भव्य प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण शिव, फुले, शाहू, आंबेडकरी प्रबोधनकार प्रा.बाळासाहेब गावंडे हे असणार आहेत तर उद्घाटन म्हणून सुभाष पाईकराव नायब तहसिलदार उमरखेड तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते देवानंद मोरे, डॉ.अजय प्रदीप लोकरे हे असणार आहेत.

तर प्रमुख उपस्थिती म्हणून विविध क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर असणार आहेत.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपति शिवाजी महाराज, चक्रवर्ती सम्राट अशोक,

महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त महापुरुष जीवन संदेश अभियान अंतर्गत ह्या भव्य प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.वर्तमान भारतात अठरापगड जाती धर्मातील बहुजन बांधव जागृत होऊन केवळ महापुरुषांच्या नावाचा जयजयकार न करता त्यांचा विचार जनमानसात रुजावा या हेतूने आम्ही दरवर्षी ह्या प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो.


तरी “सर्व उमरखेड वासियांनी ह्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे.”असे आव्हान प्रियदर्शी सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष यांनी आयोजक मंडळातर्फे केलेले आहे.
राजे संभाजी नगर चा ह्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.