
(जयभीम च्या गजराने औदुंबर नगरी दुमदुमली..!!!)
(हजारो नागरिकांनी केले बाबासाहेबांना अभिवादन…!)

उमरखेड (दि.16 एप्रिल) शहरातील मुख्य वार्ड म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे दि 14 एप्रिल 2025 रोजी विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती दिनी भव्य मिरवणुक रॅली काढण्यात आली होती.दि.10 एप्रिल ते 13 एप्रिल विविध प्रकारचे स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर दि.14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणुक रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आयोजक – प्रफुल दिवेकर यांच्या नेतृत्वखाली तसेच भीम जयंती उत्सव समिती च्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य मिरवणुक रॅली काढण्यात आली होती.





या रॅली मध्ये उमरखेड शहर नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील समाजबांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.राज्यघटने शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण केले तर त्रिशरण पंचशील भदंत किर्ती बोधी यांनी सर्वांना दिले.


चौकट:- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 152 देशांमध्ये साजरी केली जाते.भारत देशाला बाबासाहेबांनी अमूल्य संविधान लिहून सर्व भारतीयांना जगण्याचा नवा मार्ग दिला आहे, बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज देशाचा कारभार सुरू आहे. आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा…! – सिध्दार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना, उमरखेड)

चौकट – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व प्रथम संपूर्ण देशाला शुभेच्छा देतो… सदर मिरवणुकी मध्ये आरक्षणाचा तक्ता ,भिमकोरेगव विजय स्तंभ ,चक्रवर्ती सम्राट अशोक, बुद्धगया महाबोधी महाविहर ,भारतीय संविधान व उद्देशिका चे बॅनर करून मिरवणुक मध्ये दाखवण्यात आले कारण बाबासाहेब हे एका समाजाचे नसून संपूर्ण देशाचे आहे… भीम जयंती उमरखेड आयोजक – प्रफुल दिवेकर





सदर भव्य दिव्य मिरवणुक रॅली ही यशस्वी करण्याकरिता कुमार केंद्रेकर, पत्रकार सिध्दार्थ दिवेकर व अध्यक्ष योगेश दिवेकर, आकाश श्रवले, आकाश पाईकराव, आदित्य खिल्लारे, आविष्कार गायकवाड,तुषार पाईकराव, संतोष इंगोले, बुद्धभूषण इंगोले, इत्यादींनी अथांग परिश्रम घेतले.