
(जमाअत ए इस्लामी हिंद च्या इफ्तार पार्टीत केले प्रतिपादन)
उमरखेड (दिनांक 26 मार्च) राष्ट्रीय एकात्मता, बंधुत्व, प्रेम, जातिय सलोखा, वृध्दिगत व्हावा या उद्देशाने जमाअत ए इस्लामी हिंद उमरखेड च्या वतीने दर वर्षी प्रमाणे इफ्तार पार्टी कार्यक्रमाचे आयोजन दि . 25 मार्च रोजी कै . अनंतराव देवसरकर सांस्कृतिक भवन येथे जमाअत ए इस्लामी हिंद उमरखेड तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाषण करतांना प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार तथा लेखक नौशाद उस्मान औरंगाबाद यांनी म्हटलं की, “सर्व धर्म सारखे नाहीत, त्यात मतभेद नक्कीच आहेत, पण मतभेद असले तरीही मनभेद असू नये.” राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्यक्रमात सर्वसामान्यपणे फार भावनिक व तोंडदेखलेपणाचा आव आणून टाळ्यापीटू भाषणं केली जातात. पण वास्तव स्वीकारून एखादं व्याजविरहीत बैंक किंवा सर्व जाती धर्मसमुदायांची एखादी संयुक्त असे गृह संकुल, एखादी संयुक्त शाळा असं काही भरीव असं काम एकत्रितपणे करून दाखविण्याची गरज आहे.
“एकमेकांचे विरोधक असलेले अनेक पक्ष सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात तर आपण सगळे समाज मिळूनही एकत्र येऊ शकतो असं सांगून ते पुढे म्हणाले की, यासाठी विविध समाजातील महापुरुषांच्या विचारधारांना समजून घेणं गरजेचं आहे.”
या उद्देशाने एकमेकांच्या साहित्याची विचारांची देवाणघेवाण करण्याचेही आवाहन यावेळी त्यांनी केले. विशेष करून इस्लामविषयी गैरसमज दूर करण्यासाठी 1800 572 3000 या टोलफ्री नंबरची हेल्पलाईनही इस्लामिक इन्फाॅर्मेशन सेंटरतर्फे आठ भाषांत सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली.
या वेळी सर्व समाजातील वैद्यकीय , शैक्षणिक क्षेत्रा सह पत्रकार , सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी , समाज सेवक , युवक तथा अनेक नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन फिरोज अन्सारी यांनी तर आभार प्रदर्शन संघटनेचे अध्यक्ष काझी जहीरोद्दीन यांनी केले.