✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
(नागरिकांची जनभावना लक्षात घेऊन आमरण उपोषण करणार – शामभाऊ धुळे)

उमरखेड (दिनांक 23 मार्च) तालुक्यातील अवैद्य धंद्यांविरोधात भीम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा जनहित न्यूज चॅनल चे संपादक शामभाऊ धुळे उद्या दिनांक 24 मार्च पासून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरखेड येथे आमरण उपोषणास बसणार आहेत.या संदर्भात शासकीय विश्राम गृह उमरखेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

उमरखेड तालुक्यातील ढाणकी, बिटरगाव, पोफाळी कारखाना, मुळावा, हरदडा फाटा, कारखेड फाटा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे निर्माण करून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे तसेच तालुक्यातील सर्व ठिकाणी अवैध मटका राजरोसपणे सुरु असून सामान्य माणसांचे खिसे रिकामे करून स्वतःचे गल्ले भरण्याचे काम उघड वाढले आहेत.


या संदर्भात दिनांक 18 मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे शामभाऊ धुळे यांनी लेखी तक्रार दाखल केली होती, परंतु या तक्रारीची पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची गंभीर दखल घेण्यात न आल्याने आमरण उपोषणाचा मार्ग ना विलाजाने पत्करला असल्याचे धुळे यांनी सांगितले.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहर अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाते अशा ठिकाणी अवैद्य धंदेवाल्याना रान मोकळे करून दिल्यामुळे अराजक तत्वाच्या हाती आयते कोलीत पोलीस प्रशासनाने दिले कि काय ? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

तालुक्यातील महिला वर्ग कमालीचा संतापला असून ठिकठिकाणी दारूचा महापूर वाहत आहे.तसेच शहरात व तालुक्यात मटक्याचे काउंटर अधिक प्रमाणात वाढले असून यामुळे विद्यार्थी व रोज मजूर वाईट मार्गे लागून आज शहर व तालुका वाशी यांच्या घरात वादविवाद, भांडण होत आहेत. तालुक्यात चोरीच्या प्रमाणही वाढ झालेली दिसून येत आहे.

एकीकडे महिलांच्या उन्नतीसाठी लाडकी बहीण “योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार प्रयत्नशील असतांना दुसरीकडे उमरखेड तालुक्यात त्यांच्या पदरी निराशा येत आहे. सदरील अवैद्य धंदे कायमस्वरूवती बंद झाले नाही तर तालुक्यातील परिस्थिती स्फोटक बनू शकते.