
🔹 निष्ठावान कार्येकर्त्यांनाच भाजपात संधी-नितीन भुतडा🔹

✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड (दिनांक 23 मार्च) उमरखेड-महागाव विधानसभा ही यवतमाळ जिल्ह्यात संघटनात्मक बाबतीत सदैव अग्रेसर राहिली आहे. यावेळी सुद्धा उमरखेड विधानसभा सभासद नोंदणीमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगत भाजपा यवतमाळ, पुसद जिल्ह्याचे समन्वयक तथा पश्चिम विदर्भ संघटनपर्व प्रमुख नितीन भुतडा यांनी निष्ठावान कार्येकर्त्यांनाच भाजपात संधी दिल्या जात असल्याचे सूतोवाच केले.

ते भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीच्या अनुषंगाने सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेण्यासाठी दि.22 मार्च रोजी उमरखेड स्थित राजस्थानी भवन येथे आयोजित कार्येकर्ता संवाद बैठकित बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपा यवतमाळ, पुसद जिल्ह्याचे समन्वयक तथा पश्चिम विदर्भ संघटनपर्व प्रमुख नितीन भुतडा, आ.किसनराव वानखेडे, माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी आमदार नामदेवराव ससाणे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे, तालुकाध्यक्ष सुदर्शन पाटील रावते, डॉ. इरफान कुंदन, माजी नगराध्यक्ष बालाजी उदावंत, जीपचे माजी अध्यक्ष रमेश चव्हाण, साहेबराव पाटील कदम, बळवंतराव नाईक, सौ.मनीषा काळेश्वरकर, दत्ता गंगासागर, जगदीश नरवाडे, उत्तम राठोड, बाळू भट्टड, सौ. सविता पाचकोरे, सौ.आशाताई देवसरकर, नागोराव ढोले, सुदाम खंदारे आदीजन प्रामुख्याने उपस्थित होते.

संघटनात्मक दृष्ट्या नितीन भुतडा यांचे माध्यमातून उमरखेड-महागाव विधानसभा बळकटीकरनाकडे वाटचाल करीत असल्याचे आमदार किसनराव वानखेडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

माजी आमदार विजयराव खडसे यांनी भाजपा पक्ष अत्यंत शिस्तबद्धतेचे प्रतिक असल्यानेच आपण भाजपवासी झाल्याचे सांगत कुठल्याही पदाची अपेक्षा न करता आपण आयुष्यभर भाजपाचा कार्येकर्ता म्हणून राहनार असल्याचे ठासून सांगितले.

यावेळी माजी आमदार प्रकाश पाटील यांनीही संघटनात्मक कार्ये प्रणालीवर भाष्य करीत तनमन धनाने पक्षकार्ये करणार असल्याचे सांगितले. यावेळी उमरखेड, महागाव या दोन्ही तालुक्यातील शहर व ग्रामिण मंडळांचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला.

सदर कार्येकर्ता संवाद बैठकीस महागाव, उमरखेड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख,पंचायत समिती प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य, नगरपंचायत, नगरपालिका सदस्य, सर्व प्रकोष्ट, सर्व आघाड्याचे प्रमुख व कार्यकर्ते तसेच सर्व जेष्ट कार्यकर्ते,आजी,माजी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर बैठकीचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार, प्रास्ताविक पुसद जिल्हा महामंत्री महेश काळेश्वरकर तर आभार वानखेडे यांनी मानले.