माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळाने आगार व्यवस्थापक दिले निवेदन

✍️ करण भरणे सर (ढाणकी बिटरगाव प्रतिनिधी)
ढाणकी :- उमरखेड आगाराला माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ ढाणकी, यांनी बंद झालेल्या बसेस चालु करा ग्रामीण भागातील अनेक बसेस बंद करण्यात आल्या.

बसेस नसल्याने मुळे पण काही दिवस झाले उमरखेड आगाराला पांच बसेस उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे बसेसचे तुटवडा निर्माण होणार नाही तसेच उमरखेड ढाणकी पळसपुर डोल्हारी हिमायतनगर बस अभावी बंद करण्यात आल्या पण आज माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ ढाणकी यांनी वरीष्ठ अधिकारी पाठपुरावा करु तात्पुरत्या उपलब्ध करून दिल्या.

उमरखेड ढाणकी हिमायतनगर हे रेल्वे स्टेशन आहे त्यामुळे प्रवाशांची दळणवळण व्यवस्था होईल भारतात रेल्वे ने कोठेही जाने सोपे होईल हिमायतनगर रेल्वे स्टेशन जाण्याऱ्या रेल्वे तिरुपती बालाजी हैदराबाद,बल्लरशा, चंद्रपूर, मुंबई आदिलाबाद परळी, अनेक लांब पल्ल्यांच्या रेल्वे आहेत पण ढाणकी हिमायतनगर बसेस अपुऱ्या फेऱ्या असल्यामुळे अवैध वाहतुकीने प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.


त्यामुळे उमरखेड आगार व्यवस्थापक यांनी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी शक्यतो ढाणकी उमरखेड हिमायतनगर मागच्या पुर्वी प्रमाणे बसेस वाढवणे प्रवाशांच्या सुचनेनुसार माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ ढाणकी यांनी उमरखेड आगार व्यवस्थापक किनाके यांच्याकडे निवेदन दिले सर्व बसेस सुरु कराव्या अन्यथा प्रवाशी मंडळ उमरखेड आगार समोर आमर उपोषण बसेल निवेदन प्रमाणे बसेस चालू करणे..!

असे माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ ढाणकी निवेदनाद्वारे सांगितले आहे माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळाचे अध्यक्ष शेख इरफान सचिव हिरासिंह चव्हाण, कार्याध्यक्ष, नाथा पाटील उपाध्यक्ष शैलेंद्र साखरे , सदस्य जगदीश बाबु जनावार , बाबा खान , मारोती टेलर.