“अवैध जुगार व मटका कायमस्वरूपी बंधन झाल्यास आमरण उपोषणाला बसणार” – शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीटासे.!

✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड:- (दिनांक 22 मार्च) तालुक्यातील परिसरातील ढाणकी, बिटरगाव, कारखेड फाटा, हरदडा फाटा पोफळी कारखाना, मुळावा, गावाला लागले अवैध जुगार व मटक्याचे ग्रहण.


ढाणकी, बिटरगाव,पोफाळी मुळावा, शहरामध्ये मेन रोडवर मटक्याचे अनेक काउंटर उघडले आहेत. या रोड वरून ये जा करणारी शाळकरी विद्यार्थी, कास्तकार, शेत मुजरी करणारे रोज मजूर हे अवैध धंद्याला चांगलेच लागली आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांची शिक्षणावर कमी लक्ष आणि मटक्याच्या काउंटर वर ये जा जास्त प्रमाणात होत असतांना असे आढळून येत आहे.तसेच रोज मजुरी करणारे मजूर सोमवारी हप्त्याच्या दिवशी ८ दिवसाची केलेली कमाई या अवैध जुगार व मटक्यावर घालत आहेत, त्यामुळे अनेक घरांमध्ये वाद व तंटे निर्माण झालेले आहे.अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे.

तसेच ढाणकी व सोईट रस्त्याच्या बाजूला शेतामध्ये अवैधरित्या जुगार खुलेआम सुरू आहे. यावर पोलीस प्रशासनाचे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहेत.

तसेच बिटरगाव येथे मागील ८ दिवसापासून जत्रेच्या नावाखाली खुलेआम अवैध मटका व जुगार कॉन्टर टाकल्यामुळे शाळकरी विद्यार्थी व कास्तकार, सामान्य नागरिक या धंद्यामुळे वाईट मार्गाला लागली आहे.

म्हणून यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक आणि लोकप्रतिनिधी यांनी या जनतेच्या मागणीकडे लक्ष देऊन ढाणकी, बिटरगाव, पोफाळी,मुळावा, कारखेड फाटा हरदडा फाटा येथील अवैध जुगार व मटका हे धंदे तात्काळ कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. अशी मागणी भिम टायगर सेना सामाजिक संघटना आणि नागरिकांची केली आहे.