✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

यवतमाळ (दिनांक २६ फेब्रुवारी) जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध्य धंदे, अवैध्य शस्त्र, गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे या करिता मा. पोलीस अधिक्षक श्री. कुमार चिंता सा. यांनी यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार पो.नी.पो.स्टे. उमरखेड यांचे अधिनस्त सपोनी सारीका नि.राऊत पो.स्टे. उमरखेड यांना गोपनीय माहीती काढुन प्रभावी छापा कारवाई करणेबाबत सुचना दिल्या आहेत.

.दि.२४/०२/२०२५ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत बामी मिळाली की, पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत चातारी बिट परिसरामध्ये मध्यरात्री एक ईसम त्याचे चारचाकी वाहन टाटा सुमोने अवैध्य दारु वाहतुक करीत आहे.

अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन सपोनी सारीका नि. राऊत, यांनी तात्काळ याबाबत वरिष्ठांना अवगत करुन ग्राम लोहरा येथे स्टे.डा. नोंद क. ४७/२५ वेळ २३/२७ वा.अन्वये सपोनी सारीका नि. राऊत, पोकों गिरजप्पा मुसळे ब.नं. १६८१, चालक पोका/आकाश ब.नं.९६४ असे असे खजगी वाहनाने रवाना होवुन सदर टाटा सुमो वाहनास थांबवुन चालक नामे वैभव मुंजाजी हिंगडे वय २० वर्ष रा. चातारी ता. उमरखेड हा चालवित असलेलया वाहणाची पाहीणी केली असता,

त्यामध्ये देशी दारु १८० मिलीचे १८ बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बॉटल अशा एकुण ८६४ बॉटल किंमत प्रत्येकी ७० रुपये प्रमाणे एकुण ६०,४८० रुपयाची व चारचाकी टाटा सुमो वाहन अस्पष्ट दिसत असलेला वाहन क. MH-35-M-306 जुने वापरते किंमत अं.१,००,००० रुपयें असा एकुण १,६०,४८० रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने पोलीस स्टेशनला आणुन अप क.१०९/२५ कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करुन कार्यवाही करण्यात आली.

पोलीस उमरखेड जि. यवतमाळ हे अवैध्य धंदे, अवैध्य शस्त्र, गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन करण्यास प्रतीबद्व असुन यापुढे यासंबधी माहीती असल्यास सदरची माहीती जनतेने पोलीसांची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती,

सदरची कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक श्री कुमार चिंता साहेब, अपर पोलीस अधिक्षक श्री. पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उमरखेड श्री. हनुमंत गायकवाड साहेब, पोलीस निरीक्षक पो. स्टे. उमरखेड श्री. शंकर पांचाळ साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी सारीका नि. राऊत, पोकों गिरजप्पा मुसळे ब.नं. १६८१, चालक पोका/आकाश ब.नं. ९६४ पोलीस स्टेशन उमरखेड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.असून पुढील तपास सपोनि सारीका राउत हे करीत आहेत.