
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड शहरात होणाऱ्या शिवजयंती उत्सव सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात आली, असून यंदा हा सोहळा मोठ्या थाटात पारंपरिक पद्धतीने साजरा होणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुश देवसरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

दिनांक 19 फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथून भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार असून ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्या पर्यत येणार आहे.

यावेळी शिवप्रेमींना अभिवादन करता यावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा खुला करण्यात येणार असल्याचे समजते. माहेश्वरी खुले नाट्यगृह परिसरात शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात प्रामुख्याने “आम्ही जिजाऊ च्या लेकी शिवचरित्र पोवाडा “विशेष आकर्षण राहणार आहे.


शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी अध्यक्ष डॉ. अंकुश देवसरकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय गंगासागर, सचिव ऍड. शिवाजीराव वानखेडे यांच्या सह महोत्सव समितीतील सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.