
[गटविकास अधिकारी साहेबपंचायत समिती कार्यालय उमरखेड यांना निवेदन सादर]
✍️ शामभाऊ (धुळे मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक ११ फेब्रुवारी) तालुक्यातील बाळदी येथील ग्रामपंचायत हद्दीतील पांदन रस्त्या मधून निघालेल्या नाल्यावर स्लॅप टाकून नागरिकांचे आरोग्य अबाधित राखणे आणि संबंधित ग्रामसेवक यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी निवेदनात लिलाबाई लक्ष्मणराव हटकर रा. बाळदी यांनी केली आहे.

सदर नाला हा गावातील बंडू पोटे यांच्या घरापासून ते जिल्हा परिषद शाळा, लिलाबाई हटकर यांच्या घरापर्यंत आला असून या नाल्यावर स्लॅप टाकण्यात यावा.
या उघड्या नाल्यामुळे नाल्या शेजारच्या नागरिकांचे व शाळेच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आम्ही वारंवार संबंधित ग्रामसेवक यांना सांगून सुद्धा आजपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही, उलट ग्रामसेवक डी.बी सूर्यवंशी यांनी मला नाला साफसफाई करण्यासाठी १० हजार रुपयाची मागणी केली होती,

ग्रामसेवकाच्या म्हणण्याप्रमाणे हा नाला साफसफाई किंवा यावर स्लॅप टाकण्याकरिता माझ्याकडे कोणताच निधी माझ्याकडे उपलब्ध नाही.! असे कामे आमदार निधीमधून होत असतात असे उडवाउडवीचे उत्तर देऊन मला गप्प केले.
म्हणून या ग्रामसेवकाची खातेनिहाय चौकशी करावी ही सुद्धा प्रमुख मागणी आहे. या ग्रामसेवकाला गावातील इतर ठिकाणचे कामे करता येत असून बौद्ध वस्ती किंवा दलित वस्ती मधील कामे जाणून-बुजून करीत नाहीत.

या ग्रामसेवकाला बौद्ध वस्ती, दलित वस्तीमध्ये काम करण्याची एलर्जी आहे वाटते असे दिसून येत आहे. म्हणून मा.साहेबांनी अशा ग्रामसेवकाची तात्काळ बदली करून याची खातेनिहाय चौकशी करावी.

८ दिवसाच्या आत कोणतीही कारवाई न झाल्यास मला आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे लेखी निवेदनात लिलाबाई हटकर यांनी म्हटले आहे.