[पळशी फाटा येथे रास्ता रोको अंदोलन: हजारो च्या संख्येने उपस्थीत:वाहनाची प्रचंड गर्दी]
(महिलांचा रास्तारोको मध्ये टाहो; आमच्या महीमाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या सर्वच संचालकांना अटक करा)
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड :- (दि. १ जानेवारी) तालुक्यातील दिवटपिंपरी येथील शाळकरी बालीका कु महीमा आप्पाराव सरकाटे या मुलींचा स्कुलबसच्या अपघातात मृत्यू २५ जानेवारी रोजी झाला. मालवाहतूक गाडीचे स्कूल बस मध्ये रूपांतर करून संस्थाचालक दर्शन अग्रवाल यांनी करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला.

याचस्कुल बस चा पळशी फाटया जवळील लिंबाच्या झाडाला धडक देऊन अपघात झाला त्यामध्ये कु. महीमाचा मृत्यू झाला तर वीस ते पंचवीस विद्यार्थी जखमी झाले या घटनेला जबाबदार संस्थाचालक दर्शन अग्रवाल आहे.

ड्रायव्हर वर गुन्हा दाखल झाला संस्था चालक दर्शन अग्रवाल व मुख्याध्यापक माधव कदम यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होवून आठ दिवस झाले तरी संस्थाचालक दर्शनअग्रवाल यास पोलीस प्रशासन यांनी अटक केली नाही. तसेच आरटीओच्या अहवालानुसार त्या स्कूलबस चे कुठल्याही इन्शुरन्स फिटनेस प्रमाणपत्र, पियुसी नव्हते.

पालकांनी व विद्यार्थ्यांनी वेळोवेळी दर्शनागरवाल यांना पालक सभेमध्ये तोंडी याची सूचना देऊनही संस्थाचालक दर्शन अग्रवाल यांनी कुठलीही दखल न घेतल्यामुळे हा भीषण अपघात झाल्यामुळे त्याच फक्त संस्था संचालक जबाबदार आहे.

असा पालकांचा आरोप आहे त्या निषेधार्थ पळशी फाटा येथे दि १ फेबूरवारी ला दुपारी १२ वाजता आंदोलन केले पळशी फाटा येथे दोन तास ट्रॉपीक जाम होती उमरखेड – पूसद राज्य मार्ग रस्ता दोन तास चक्का जाम केला चक्का जाम मध्ये महिला पुरुष ग्रामस्थ व पालक इतर गावचे मंडळी होती त्यामध्ये मागणी पोलीस प्रशासणाला केली.

संस्थाचालक दर्शन अग्रवाल यास अटक करा म्हणून भर उन्हात रस्त्यावर महिला व पुरुष आले होते दर्शन अग्रवाल यास अटक का करत ना म्हणुन महिलांनी तळ ठोकुण बसल्या होत्या.
रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी प्रमुख मागण्या कु महीमा आप्पाराव सरकाटे या मुलीच्या कुटुंबाला न्याय दयावा. व संस्थाचालक दर्शन अग्रवाल तात्काळ अटक करा स्टूडंट वेल्फेअर इंग्लीस मिडीअम स्कुलची मान्यता रद्द करा मृत्यूक महीमा च्या कुटंबाला संस्थाचालकाकडून एक कोटी रुपये मदत दयावी.तपास अधिकारी बदलून दयावा या मागण्या संदर्भात रास्ता रोको करण्यात आला.

भर उन्हात महिलांनी आक्रमता दाखविली जोपर्यत आरोपी दर्शन अग्रवाल यास अटक होत नाही तो पर्यंत आम्ही जाग्यावरून हालणार नाही असा दम पोलीस प्रशासणाला दिला.रास्ता रोको करण्यासाठी पिंपरी दिवट,, पोफाळी,कळमुला, पळशी,नागापूर,मुळावा,, जनुना येथील हजारो ग्रामस्थ महिला पुरुष उपस्थीत होते.
दिवटपिंपरी येथील शेकडो महिलांनी पोलीस प्रशासणाचा निषेध्द केला आरोपी दर्शन अग्रवाल यास अटक का करत नाही असा प्रश्न महिला पोलीसांना विचारला पण पोलीस प्रशासन हैराण झाले त्यावेळी त्यांनी वेळ मागीतला तर दोन – तीन दिवसात अटक करून असे आश्वासन दिले, त्यानंतर रास्ता रोको स्थगीती करण्यात आला.

पालकांनी पोलीस प्रशासणावर विश्वास ठेवला मंगळवारपर्यंत आरोपीस अटक जर झाली नाहीतर बेमुदत रास्ता रोको करू असा इशारा ग्रामस्थानी दिला.
आंदोलनात पोलीसानी कडक बंदोबस्त ठेवला पोफाळी उमरखेड येथील चोख बंदोबस्त ठेवला . कोणताही अनुसुचीत प्रकार घडला नाही.
चौकट :-मृत्यूक मुलीची काकु रस्त्यावर हंबडा फोडून अक्षूच्या धारा डोळ्यातून पडत होत्या , त्यावेळी सर्वांच्या भावना दुःखावल्या होत्या. कु महीमा ची काकु बोलत होती नवस करून तेरा वर्षानी महीमा आमच्या घरात जन्माला आली आणि तिचा शाळा संचालकाने बळी घेतला.
चौकट :- कायद्यानुसार आरोपीस अटक करू पोलीसाला वेळ दयावा आरोपीचा शोध घेत आहे घटणा दुदैवी झाली आम्ही पोलीस प्रशासन मृत्यूक मुलीच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहे.हनुमंत गायकवाड (पोलीस उपविभागीय अधिकारी)
चौकट :- रास्ता रोको आंदोलणात शिवसेना (शिंन्दे) गट सामील होवून आरोपीस अटक करा म्हणुन त्यांनी सुद्धा निवेदन दिले . शिंन्दे गटाचे सैनिक पळशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन सहभागी होते चिंतागराव कदम, सविता कदम,ॲड संजय जाधव, कैलास कदम, रवि रुडे, राजू गायकवाड यांनी सहभाग घेतला.