
✍🏻शामभाऊ धूळ (मुख्य संपादक)✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) ✍🏻करण भरणे (बिटरगाव / ढाणकी प्रतिनिधी)
ढाणकी :- आज च्या युगात पैसा मिळवण्यासाठी लोक लूट मार, धोखा धाडी करून पैसा मिळविण्याचा प्रयत्न करत असतात, तर काही लोक पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची प्रवृती बळावल्याचा दैनंदिन वृत्त पत्रात वाचायला मिळतात.

त्यामुळे प्रामाणिपणा आणि माणुसकीचा काळच राहिला नसल्याचं अनेकांकडून बोललं जातं मात्र, हाच दावा खोडून काढणारी घटना ढाणकी मध्ये घडली आहे.

एकीकडे पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची प्रवृती आपण समाजात पाहायला मिळते. पण ढाणकी मध्ये आकाश दिलीप मिटकरे याची अडीच तोळा सोन्याचे ब्राशलेट हरवली होती.

ते गरीब खेड्या गावात जाऊन चैन पोत मनी विकणारी मसणजोगी समाजाची निर्मलाबाई साईनाथ इरेवाड झोपडपट्टीत राहणारीगरीब महिलेला भेटताच त्यांनी पत्रकार संजय सल्लेवाड यांना सांगून ती त्यांच्या मार्फत बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार कैलास भगत यांना संपर्क करून अडीच तोळा सोन्याची ब्राशलेट आकाश दिलीप मिटकरे यांना परत करून दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे माणुसकी अजून जिवंत असल्याचं दाखविले आहे.
निर्मलाबाई साईनाथ इरेवाड यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार कैलास भगत यांनी पुष्प गुच्छ देऊन सन्मान केला.