(वनस्पतीशास्त्र विभाग)

✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दि. ३१ जानेवारी) गो. सी. गावंडे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात विद्यार्थ्यांसाठी व सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा (प्रशिक्षण) ठेवण्यात आले.

आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी “मशरूम उत्पादक” म्हणून आपला नवीन स्वतंत्र व्यवसाय चालू करन्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले व आळंबी लागवड शेतकऱ्यांसाठी एक उत्तम जोडधंदा, कमी खर्च, कमी मेहनत आणि भरघोस नफा करून देणारा हा व्यवसाय आहे.
भारतामध्ये मशरूम उत्पादन हे अजूनही एक नवीन संकल्पना आहे आणि भविष्यात मशरूमला मोठी बाजारपेठ मिळणार आहे असे प्रशिक्षणा दरम्यान वनस्पतीशास्त्र विभागातील प्रो. डॉ. प्रशांत य. अनासाने यांनी सांगितले.

“ओयस्टर मशरूमची लागवड आणि उत्पादन” यांच्या संपूर्ण मार्गदर्शनासह, मशरूमचे मार्केटिंग ची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
दरवर्षी मशरूम लागवड व प्रशिक्षण ची कार्यशाळा गावंडे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागात होत असते, वनस्पतीशास्त्रातील सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

मागील वर्षी काही विद्यार्थ्यांनी आपल्या शेतात स्वतंत्रपणे आळंबी चे प्रात्यक्षिक केले या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच प्रा. डॉ. पी. डी. वंजारे, प्रा. डॉ. के. एस. सोनटक्के,प्रा. डॉ. एस. व्ही. सुर्वे, प्रा. डॉ.आर. जे. डहाके यांनीही कार्यशाळेला उपस्थिती नोंदविली.

अशा प्रकारचे वेगवेगळे शिबिर महाविद्यालयात राबविण्यात येतात व त्यासाठी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज, यवतमाळ संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.रामसाहेब देवसरकर व सचिव माननीय श्री. डॉ. यादवराव राऊत साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा.कदम यांच्या मार्गदर्शन व पाठबळ विद्यार्थ्यांना लाभते.