(बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार संतोष मनवर यांची गुन्हे शाखेत वर्णी)

✍🏻 शाम भाऊ धुळे मुख्य संपादक ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)
✍🏻 करण भरणे सर (बिटरगाव ढाणकी सर्कल प्रतिनिधी) मो.9421847351

उमरखेडः- जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय कारणास्तव पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.
बिटरगावचे ठाणेदार संतोष मनवर यांची यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेत पुन्हा एन्ट्री झाली आहे तर कैलास भगत यांची बिटरगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आणि त्यांनी आज रोजी रुजू होऊन पदभार सांभाळा आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी मंगळवारी बदलीचे आदेश काढले आहे. कैलास भगत यांना यवतमाळ जिल्ह्यातील भागाचा जास्त अनुभव असून त्यांनी महागाव, दराटी येथे सेवा दिली आहे. तसेच ते कारखाना पोफाळी पोलिस ठाण्याचे ठाणेदार होते. त्यानंतर त्यांची बदली उमरखेड पोलीस ठाण्यात झाली होती.

कैलास भगत अतिशय अभ्यासू व कानुन कायद्यात कर्तव्य करणारे व गुन्हेगारी होण्याच्या अगोदर गुन्हेगारीला आळा घालणारे अधिकारी असल्याची ओळख असून त्यांनी पोफाळी पोलीस ठाण्यात गुन्हेगारीचा आलेख कमी केला आहे.
कारखाना येथे असतांना त्यांनी अवैध व्यवसाय व गुन्हेगारीवर आपला वचक निर्माण केला होता.

बिटरगाव ढाणकी पोलीस स्टेशन हे अतिशय संवेदनशील असलेल्या भागात अनुभवी व गुन्हेगारी वृत्ती वर आळा घालण्यासाठी कायद्याच्या चौकटीत गुन्हेगाराना धडा शिकवणारे,अवैध व्यवसाईक व गुन्हेगारा बद्दल कर्दंनकाळ, कर्तव्यात तडजोड न करता गुन्हा खपून न घेणारे कैलास भगत यांची बिटरगावचे नवीन ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

ठाणेदार म्हणून कैलास भगत यांची बिटरगाव पोलीस स्टेशन येथे नियुक्ती झाल्यामुळे उमरखेड प्रेस क्लब च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन भेटून सत्कार व स्वागत करण्यात आला. यावेळी उमरखेड प्रेस क्लब चे तालुका अध्यक्ष शामभाऊ धुळे, उपाध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर, सचिव प्रसेन दिवेकर, सदस्य प्रफुल दिवेकर इत्यादी पत्रकार बंधू उपस्थित होते.

बिटरगाव,ढाणकी व पोलिस ठाण्याच्या हद्दितिल लोकांना एक चांगले पोलिस अधिकारी मिळाले म्हणून नागरिक समाधान व्यक्त करत आहे.
