
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)
✒️करण भरणे (ढाणकी सर्कल प्रतिनिधी) मो.9421847351
ढाणकी (दि. 29 जानेवारी) पोलीस ठाण्याच्य हददीतील वाढत्या गुन्हेगारीला वेसन घालायची असेल तर संबंधीत पोलीस प्रषासनाला गावातील जागृत नागरीकांच्या सहकार्याची नितांत गरज असते. गावकऱ्यांच्या पोलीसांना गोपनिय माहिती पुरविल्यास गुन्हेगारीचा बिमोड करणे सहजशक्य होईल.

याकामी हातभार लावण्यासाठी तरूण पिढीने पुढाकार घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन बिटरगाव पोलीस स्टेषनचे ठाणेदार संतोश मनवर यांनी केले.
उमरखेड तालुक्यातील करंजी येथे स.सो.,ग्रा.प.यांच्या संयुक्त विदयमाने ठाणेदार संतोश मनवर यांचा 24 जाने 2025 रोजी सायं षुक्रवारी नागरी सत्कार समारंभ आयोजीत केला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्राम विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष माधवराव पाटील कलाणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड प.स.चे माजी सभापती खाजा भाई कुरेशी, वसंत सहकारी साखर कारखाना उमरखेड माजी संचालक बळवंतराव नाईक,
ग्रा.प.सरपंच सिध्दोधन घुगरे, संगीताताई कलाणे पोलीस पाटील,षिंदेगट षिवसेना ढाणकी षहर महीला आघाडी अध्यक्षा आषाताई विक्रम कलाणे,भाजपा ढाणकी शहर महिला आघाडी अध्यक्ष शिवानीताई रूपेष कोडगीरवार,उमरखेड ता.भाजपा अध्यक्ष ,खरेदी विक्री समीती उमरखेडचे अध्यक्ष सुदर्षन रावते.

ढाणकी शहर भाजपा अध्यक्ष महेष पिंपरवार,युवा नेते राहित वर्मा,ढाणकी न.प.नगरसेवक योगेवार ,दै.पुण्य नगरीचे पत्रकार नागेष महाजन आदीची प्रमुख उपस्थिती होते.
पुढे बोलतांना ठाणेदार म्हणाले की, बिटरगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात बंदी भागाने व्यापले आहे.त्यामुळे तेथे स्वातंत्रच्या 76 वर्षात देखील आरोग्य व शिक्षणाच्या, दळणवळणाच्या या सारख्या मुलभुत सेवा पोहचल्या नाहीत त्यामुळे याभागात वेसनाधिनता ही भीषम समस्या बनली आहे.
लपुनछपून ग्रामीण भागात सुरू असलेले अवैध्य गावठी व हातभठी दारू विक्रेते पोलीसाच्या रडारावर असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील असे नागरीकांना बोलतांना सांगीतले.

याप्रसंगी खाॅजा भाई कुरेशी यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, बिटरगाव पोलीस स्टेषनला साहेब रूजु झाल्यापासून गुन्हेगारीचा आलेख मंदावला आहे.साहेबांचा आणखी काही वर्ष बिटरगाव पोलीस स्टेशनला मुक्काम वाढल्यास गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन झाल्याषिवाय राहणार नाही.
पत्रकार नागेश महाजन,सुदर्षन रावते.बळवंतराव नाईक,महेष पिंपरवार,राहित वर्मा, यांनी ठाणेदार संतोश मनवर यांच्या पोलीसींगचे भरभरून कौतुक केले.

यावेळी ठाणेदार संतोश मनवर यांच्या हस्ते गरीबीवर मात करून गावातील 4 विदयाथ्र्यांनी एम.बी.बी.एस परीक्षेत्र गुणवत्ता प्राप्त केल्याने विदयाथ्र्यांसह त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
सोबतच सामाजीक कार्यात महिलांसाठी आग्रेसर असणाऱ्या आशाताई कलाणे, शिवाणी कोडगीरवार यांना सन्मानित केले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन राहूल चंद्रे यांनी केले तर आभार सुमेध घुगरे यांनी मानले,कार्यक्रम यषस्वीतेसाठी गावकऱ्यांनी अथक परीश्रम केले.