✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड (दिनांक 23 जानेवारी) आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मॅडम व कर्मचारी यांनी थोर महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून आगार परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.


या स्वच्छता मोहिमेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथील विद्यार्थी व शिक्षक तसेच गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयातील एन .सी .सी. कॅडेट व महाविद्यालयातील विद्यार्थी नगरपालिका सफाई कामगार यानी एकजुटीने या मोहिमेत सहभाग घेतला.

तसेच आगर कर्मचारी वर्ग यांनी देखील स्वच्छता मोहीमेत मोलाची भूमिका बजावली.
यावेळेस आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मॅडम यांनी आगार परिसरात स्वच्छता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व स्वच्छता राखण्याच्या दृष्टिकोनातून परिसरातील नागरिकांनी व प्रवाशांनी आगार परिसरात बांधलेल्या सार्वजनिक स्वच्छालयाचा वापर करावा, आणि एक्झिट गेटच्या परिसराचा नको त्या गोष्टीसाठी वापर करू नये.

हे आगार उमरखेड वासियांचे असून आपण सर्वांनी स्वच्छता राखली पाहिजे व आपले आगार स्वच्छ आणि निर्मळ असले पाहिजे अशी विनंती नागरिक व प्रवासी यांना करण्यात आली.
