
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक२३ जानेवारी) तालुक्यातील चुरमुरा रोडवरील अंबोना टैंक / तलाव लगत अंदाजे एक ते दीड एकर जमीनीवर यांनी अतिक्रमण केल्यामुळे सदर जमीन शासनाने ताब्यात घेवून अतिक्रमण करणाऱ्या संजय केवळा राठोड फौजदारी गुन्हे दाखल करावे.

अशी लेखी तक्रारशाम माधव धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भिम टायगर सेना, यवतमाळ) यांनी मृद व जलसंधारण अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल केली आहे.

चुरमुरा रोडवरील अंबोना टैंक / तलाव लगत अंदाजे एक ते दीड एकर जमीनीवर संजय केवळा राठोड यांनी अतिक्रमण करुन स्वतःच्या ताब्यात घेतली आहे. सदर जमीन ही शासनाची असून, यावर कोणीही मालकी हक्क दाखवू शकत नाही. त्यामुळे सदर व्यक्ती हा स्वतःचा मालकी हक्क सांगुन नागरिकांकडून लागवडीच्या नावावर नागरिकांची फसवणूक करीत आहे.

संजय केवळा राठोड यांच्याकडे सदर जमीनीचे कोणतेही मालकी हक्क असल्याचे पुरावे नाहीत. त्यामुळे संजय केवळा राठोड यांनी शासनाच्या एक ते दीड एकर जमीनीवर केलेले अतिक्रमण शासनाने ताब्यात घेवून संजय राठोड यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच यामध्ये अधिकारी व कर्मचारी हे सुध्दा आर्थिक देवाण-घेवाण करुन राठोड यांना मुक संमती दर्शविली जात आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.असे तक्रार निवेदनात तक्रारकर्ते शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भिम टायगर सेना, यवतमाळ) यांनी म्हटले आहे.