
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक १३जून) शहरातील सिद्धेश्वर वार्ड येथील डीलर शेवंतराव. ता. गायकवाड यांच्या रास्त भाव धान्य दुकानातून निष्कृष्ट दर्जाचे मानवास खाण्यास लायक नसणारे, केरकचरा मिश्रित, भेसळयुक्त असणारे धान्य वाटप करीत आहे.

सदर दुकानदार हा निष्कृष्ट धान्य वाटपाबाबत विचारणा केल्यास महिला ग्राहकास उद्धटवर्तन आणि बोलून अपमानित करीत आहेत.

चौकट:- तात्काळ चौकशी करून कारवाई करणार उमरखेड तहसीलदार सुरडकर
चौकट :- निष्कृष्ट दर्जाचा धान्याचा साठा शासकीय बदामात जमा करून नवीन साठा राशन कार्डधारक यांना वाटप करणार – पुरवठा अधिकारी महाजन.

तरी सदर दुकानाची अन्न व पुरवठा विभाग निरीक्षक यांच्यामार्फत चिकित्सक आणि सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करून संबंधिताचे धारक परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी करीत आहे.

अशी रितसर तक्रार शामभाऊ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ यांनी केली.