
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक २५ एप्रिल) शहरामध्ये १४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात व शांततेत पार पाडल्याबद्दल उमरखेड पोलीस स्टेशन तर्फे सत्कार सन्मान समारंभ चा कार्यक्रम पोलीस ठाण्यात आयोजित केला होता.

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.नितीन भुतडा (भा.ज.प जिल्हा समन्वयक) तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार विजयराव खडसे, डॉ. प्रा. अनिल काळबांडे सर, ऍड. जितेंद्र पवार, बाळूभाऊ भट्टड हे उपस्थित होते.

शहरातील प्रमुख मिरवणुक रॅली डॉ.आंबेडकर वार्ड मधून भीमजयंती उत्सव समितीचे आयोजक/अध्यक्ष प्रफुल दिवेकर आणि कार्यध्यक्ष सिध्दार्थ दिवेकर यांचा शंकर पांचाळ, ठाणेदार, नितीन भुतडा (भा.ज.प जिल्हा सम्वयक ), मा.आमदार विजयराव खडसे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला.



तसेच यावेळी बोरबन मधून सुमेध बोधी युवा मंडळ चे अध्यक्ष रविंद्र वाठोरे आणि आकाश लोणकर तर भगतसिंह वार्ड मधून संतोष कांबळे, इंदिरा नगर मधून शामभाऊ धुळे, पाटील नगर मधून निशांत मनवर, भिमजयंती अध्यक्ष/आयोजक – यांचा ही सत्कार सन्मान करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन भाऊ भुतडा यांनी सुद्धा आपले रोखठोक मत व्यक्त केले. माजी आमदार विजयराव खडसे यांनी सुद्धा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, रविंद्र वाठोरे, डॉ. प्रा. अनिल काळबांडे यांनी आपले विचार व्यक्त केले.




डॉ. प्रा.अनिल काळबांडे यांनी ठाणेदार शंकर पांचाळ यांचा भारतीय संविधान प्रत देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक व आभार ठाणेदार पांचाळ यांनी व्यक्त केले.


या कार्यक्रमाला पत्रकार प्रसेनजीत दिवेकर,शामभाऊ धुळे, प्रफुल दिवेकर सिध्दार्थ दिवेकर,प्रकाश हापसे, वीरेंद्र खंदारे, निशांत मनवर, अमोल मंडाले, रविंद्र वाठोरे,आकाश लोणकर,संतोष कांबळे यांनी उपस्थिती दर्शविली.