
🔵हजारोंचा जनसमुदाय उतरला रस्त्यावर 🔵

🌟मुक्त करा ..मुक्त करा..महाबोधी महाविहार मुक्त करा.. या घोषणांनी आज संपूर्ण उमरखेड शहर दुमदुमले. 🌟
✍️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड (दिनांक 03 एप्रिल) बिहार मधील बोधगया येथील महाबोधी महाविहार हे ब्राह्मणी महंतांच्या ताब्यातून काढून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, बी.टी.एम.सी कायदा 1949 रद्द करावा.

या मागणीसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळ व समस्त शिव,फुले,शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भिक्षु संघ तथा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले.

या मोर्चाचे प्रास्ताविक चक्रवर्ती सम्राट अशोक धम्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विद्वान भाऊ यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान येथून सुरू होऊन छत्रपती शिवराय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक, महात्मा फुले यांच्या प्रतिमांना वंदन करत ह्या रॅलीची सांगता उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे भाषणाने व मार्गदर्शनाने करण्यात आली.

यावेळी बोलताना भिक्षु संघाने महाबोधी महविहार ही जगभरातील तमाम बौद्धांची विरासत आहे.ती कायद्याने बौद्धांच्या ताब्यात यावी.ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली .ते पवित्र ठिकाण तात्काळ महंतांच्या कब्जातुन मुक्त करावी.अशी मागणी केली.

यावेळी मार्गदर्शक म्हणून भदंत खेमधम्मो महाथेरो,भदंत दयानंदजी, भदंत सत्यपाल महाथेरो, यांनी केले. तर समर्थन पर प्रेमाताई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.





बुद्धगया महाविहार ही बौद्धांची विरासत असून ती ब्राम्हणी महंतांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी.बिटीएमसी ॲक्ट 1949 रद्द करा. ह्या प्रमुख मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या.

या मोर्चासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळ, डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड महिला मंडळ, इंदिरानगर जय भीम नगर भगतसिंग नगर तसेच तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

दोन दोन च्या रांगेने अतिशय शिस्तबध्द पद्धतीने मार्गक्रमण आणि अठरापगड जाती धर्मातील बांधवांनी या भव्य दिव्य रॅली मोर्चाला यावेळी समर्थन दिले.यामुळे ही सर्वत्र रॅलीची चर्चा सुरू आहे.