(२० कर्तुत्वान शेतकऱ्यांसह कृषी शास्त्रज्ञ, कृषी उद्योजकांना भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित)
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड :- (दिनांक ११ जानेवारी) शेतकरी सतत आपल्या अनुभवाच्या आधारे नवीन नवीन प्रयोग शेती मध्ये करत असतात,

शेतकऱ्यानी आत्मसात केलेल्या तंत्रावर शेतकरी निश्चित विश्वास ठेवतात, शेतकरी आणि शेती समृध्द होण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत शेतकरी एकत्र येऊन आपल्या शेतावर उपयोग केलेले तंत्रज्ञान आणि अनुभव एकमेकांना देणे आणि या अनुभवांचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होण्याच्या अनुषंगाने ही प्रगतशील शेतकऱ्यांची कार्यशाळा सर्व शेतकऱ्यांना उपयोगी असल्याचे मत डॉ. विजय माने यांनी आपल्या प्रास्तावनेत मांडले.
दर वर्षी जानेवारी महिन्यात लोकनेते सहकार सहकारमहर्षी भाऊसाहेब माने यांच्या स्मृतीदिना निमित्त २४ वर्षा पासून ही कार्यशाळा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान मंच अंतर्गत भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान यांच्या मार्फत कृषी महाविद्यालय उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे घेण्यात येते.

यामध्ये कॅप्टन डॉ.लक्ष्मीकांत कलंत्री नागपुर, डॉ. मुसा मगदूम कोल्हापुर, डॉ. नितीन गुप्ता अकोला डॉ. विजय शेलार अहिल्यानगर, रामकृष्ण सोनकुसरे भंडारा, मंगला माळवे यवतमाळ आकाशवाणी, गोपाल हागे अकोला, सचिन होळकर नाशिक, सोनाली कराळे अहिल्यानगर, गजानन पठाडे हिंगोली, सिद्धेश्वर बिच्चवार यवतमाळ, कालिदास नवले बीड, मनीषा शेलार पुणे, शिवाजीराव राजपूत धुळे, प्रतीक साबे बुलढाणा,

निलेश टाके गोधनी यवतमाळ, सुरेशसिंग ठाकूर हिंगोली, सुधाकर ठाकरे यवतमाळ, संतोष सूर्यवंशी सातारा, मुख्याध्यापक शिक्षक वृंद व शाळा सुधार समिती, स्वयंपाकी जि.प. शाळा चातारी यवतमाळ यांचा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद मुकेवार, विभागीय कृषी संचालक श्री प्रमोद लहाळे, रेशीम विभगाचे श्री महेन्द्र ढवळे, शासकीय अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ चे सह. अधिष्ठाता डॉ. विजय माने, शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे
अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, डॉ. प्रशांन्त नाईक स्पार्ट प्रकल्प विभागीय अधिकारी अमरावती, यवतमाळ जिल्हा कृषी अधीक्षक श्री. सतोष डांबरे, विलास शिंदे जिल्हा रेशीम विकास अधिकारी यवतमाळ, माजी आमदार विजय खडसे, नितिन माहेश्वरी, कल्याणराव माने, अँड अर्चनाताई माने, तालुका कृषी अधिकारी श्री. गंगाधर बळवंतकर,
भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अशोक वानखेडे या मान्यवरांच्या हस्ते भाऊसाहेब माने राज्य स्तरीय कृषी गौरव पुरस्कार, सर्व सत्कारमूर्ती चा गौरव करण्यात आला. सर्वच प्रगतशील शेतकरी, शास्त्रज्ञ, कृषी उद्योजक, कृषी वर लिखाण करणारे
आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांनी आपले यशस्वी होण्या मागचे अनुभव व्यक्त करून सर्व स्थानिक शेतकऱ्यांना तीळ संक्रांती चे तीळ गुळा सोबत तंत्रज्ञाना चे वाटप केले.
कार्यक्रमाचे संचलन सुनील वानखेडे यांनी तर आभार प्रविण सुर्यवंशी यांनी मानले.

चौकट :- कृषी हा विषय समवर्ती सुचीमध्ये आला पाहीजे डॉ. शरद निंबाळकर माजी कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

चौकट :- पुढील येणाऱ्या पिढयांना संरक्षीत करायचे असेल तर शेती आणि पर्यावरण जोपासणे अत्यंत गरजेचे आहे.- डॉ. आनंद मुकेवारजेष्ठ कृषी शास्त्रज्ञ नागपुर