
✍️समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी)
माहूर (दिनांक २८ एप्रिल) तालुक्यातील सर्वोत्कृष्ट असलेली ग्रामपंचायत मौजे लांजी तालुका माहूर जि. नांदेड येथे आज तिसरा दिवस आज दिनांक २८/४/२०२५ रोजी शिवार श्रमदान करण्यात आले. शिवार फेरी लोकसहभागातून गाळ काढणे.

आयोजन करून संघाण नकाशा काढण्यात आला या कामाला गावातील लोकांचा चांगला प्रतिसाद पहावयास मिळाला शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी टपा दोन अंतर्गत माहिती दिली व गावातील ग्राम कृषी समिती चे सदस्य व गावचे लाडके सरपंच मारोती रेकुलवार उपसरपंच प्रतिनिधी गजानन हरी जाधव ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी,

बालिका पंचायत सरपंच कुमारी रेणुका गाजनन मुतेवार उपरपंच कुमारी माधुरी गजानन जाधव सचिव कुमारी प्रतीक्षा गजानन पवार कृषी सहायक सुधीर राजूरकर व गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या दरम्यान कृषी सहाय्यक सुधिर राजूरकर यांनी गावातील शेतकऱ्यांच्या घरी घरी जाऊन शिवारश्रम या योजनेची ४९ प्रकारच्या लाभाची माहिती देणार असे त्यांनी सांगितले.