✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड (दिनांक ११ जानेवारी) समाजाने संघटित होऊन संवैधानिक मार्गाने इतरांच्या अधिकारावर गदा न आणता आपला विकास केला तर लिंगायत समाजाला शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उत्कर्ष साधता येईल.

त्यामुळे समाज संघटना आवश्यक असून लिंगायत समाजाने एकजूट व्हावे तसेच समाजात संवाद वाढावा एकमेकांच्या समस्या समजून घेण्यासाठी व त्यावर उपाय शोधणे सोयीचे व्हावे.
तसेच उमरखेड तालुक्यातील सर्व लिंगायत बांधव कुटुंबाची संख्या कळणे व सर्व लिंगायत शाखांमध्ये एकीची भावना निर्माण होणे व ती निरंतर टिकून राहणे हे अगत्याचे झाले असल्याकारणाने गुरुवर्य श्री ष.ब्र १०८ सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य महाराज,

हदगाव मठ संस्थान यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली लिंगायत समाजाच्या विशेष सभेचे आयोजन १२ जानेवारी २०२५ रविवार रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता महात्मा बसवेश्वर अभ्यासिका, शिरडकर कॉम्प्लेक्स, पुसद रोड (ज्योतिबा हायस्कूल जवळ उमरखेड) येथे करण्यात आलेले आहे.

तरी समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समिती उमरखेड द्वारा करण्यात आले.