
(पोलीस पाटील तसेच महिला दक्षता समितीसह मान्यवरांना केले संबोधित)
श्रीक्षेत्र माहूर समाधान कांबळे

माहूर:- (दिनांक 31 मार्च) पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीच्या निमित्ताने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी माहूर पोलीस ठाण्याला भेट देऊन येथे पोलीस पाटील महिला दक्षता समितीसह नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत शिवप्रकाश मुळे यांचे सह पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स.पो.नी. शिवप्रकाश मुळे यांना रिवार्ड देऊन त्यांचे अभिनंदन केले.

दि 29 रोजी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी वार्षिक तपासणी निमित्त माहूर पोलीस ठाण्याला भेट दिली येथे सपोनी शिवप्रकाश मुळे यांचे सह अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचा सलामी देऊन सन्मान केला यावेळी पोलीस विभागाअंतर्गतच्या सर्व तपासणी अंती माहूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष कामगिरी बजावल्याने त्यांचे अभिनंदन केले

तसेच यावेळी आलेल्या पोलीस पाटील व महिला दक्षता समितीच्या मान्यवरांना त्यांनी संबोधित करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले.

वाई बाजार येथील पोलीस ठाण्याची गरज पाहता येथे पोलीस मदत केंद्राचे उद्घाटनही त्यांनी यावेळी वाई बाजार येथे जाऊन केले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक उदय खंडेराय उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे परीक्षा विधीन अधिकारी किरण पोपळघट सपोनी शिवप्रकाश मुळे सपोनी रमेश जाधवर सपोनी शेख गफार पोउपनी पालसिंग ब्राह्मण पोउपनी आने बोईनवाढ,

यावेळी पेंटर सुरेश आराध्ये यांनी रांगोळी द्वारे शहाजी उमाप यांचे रांगोळीतून छायाचित्र काढल्याने त्यांची स्तुती केली यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी सर्व तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित होते.