
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड:- (दिनांक 30 मार्च)बिहार मधील बौद्धगया येथील महाबोधी महाविहार हे भारतासहित जगभरातील लोकांचे पवित्र असे प्रमुख प्रेरणास्थान आहे. आणि हे महाबोधी महाविहार अनेक वर्षापासून ब्राह्मणी महंतांच्या ताब्यात असून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे.

तसेच भारतीय संविधानानुसार अनुच्छेद 25 व 26 हे धार्मिक स्वतंत्र देतात.
परंतु त्या अनुच्छेदाचे उल्लंघन करणारा कायदा म्हणजे बि.टी.एम.सी.ऍक्ट 1949 हा काळा कायदा रद्द करून तेथील कार्यभार सांभाळन्या साठी आम्हाला आमच्या हक्काच धार्मिक स्वातंत्र्य द्यावे.

अशी मागणी सध्या संपूर्ण देश विदेशातून होत आहे. ठीक ठिकाणी मोर्चे, आंदोलने धरणे होत आहेत.


त्याच आंदोलनाच्या समर्थनात उमरखेड या ठिकाणी दिनांक 2 एप्रिल 2025 बुधवार रोजी वेळ सकाळी 11 वाजता उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान पासून सुरु होणार आहे. ते उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड असे भव्य शांतता रॅली चे नियोजन करण्यात आले आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ बोरबन उमरखेड, जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळ, राजे संभाजीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड, इंदिरा नगर, जयभीम नगर, भगतसिंग वार्ड, यू पी पी कॉलनी, उमरखेड तसेच समस्त शिव, फुले,शाहू, आंबेडकरी अनुयायी व सामाजिक संघटना, यांच्याकडून तमाम जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.