
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर सहसंपादक)
उमरखेड – तालुक्यातील गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा मोफत व्हाव्या यासाठी उपजिल्हा रुग्णालय कोट्यावधी रुपये खर्च करून उमरखेड येथे उपजिल्हा रुग्णालयाची भव्य दिव्य वास्तू तयार झाली व वैद्यकीय यंत्रणाही सुसज्ज करण्यात आली.

परंतु या रुग्णाला गरजूंना शासनाकडून मिळणाऱ्या आरोग्य सुविधा मिळतात की नाही. यावर संशय व्यक्त केल्या जात आहे खाजगी ब्लड लेबॉर्टी धारक थेट शासकीय रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावर रुग्णांची रक्त चाचणी करताना निदर्शनास आले असल्याचे भयान वास्तव समोर आल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.

आरोग्य यंत्रणेने रुग्णालयात पुरेशी यंत्रणा कार्यरत करावी अशी मागणी नागरिकाकडून जोर धरत आहे दुरून डोंगर साजरे या उक्तीप्रमाणे येथील उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था असल्याची सर्वसामान्य गरजू रुग्णांकडून ओरड होत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य दखल घ्यावी व रुग्णालयात खाजगी व्यवसायिकांचा हस्तक्षेप होता कामा नये
याबाबत दक्षता घ्यावी अशी मागणी आहे .