
(माहुर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था)
✍🏻 समाधान कांबळे (माहूर प्रतिनिधी)
माहूर (दि. 11 जानेवारी) उद्या दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती असून हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो.
या अनुषंगाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे दुपारी 1.00 वाजता या संस्थेतून यशस्वी उद्योजक म्हणून नावा रुपात आलेले माजी प्रशिक्षणार्थी यांचा गौरव कार्यक्रम, तसेच विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन माहूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर येथे करण्यात आलेली आहे.
शहरासह तालुक्यातील सर्व उद्योगप्रेमी व विद्यार्थी उपस्थित राहण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर चे प्राचार्य फारुखी ए वासे यांनी केले आहे.